कामगार दिनाच्या पूर्वसंध्येला दोघांचा खून

वैभववाडी : कामगार दिनाच्या पूर्वसंध्येला दोन कामगारांना एका कामगाराने भोसकले. या रक्तरंजित घटनेने वैभववाडीसह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. वैभववाडी तालुक्यातील एका क्रेशरवर ही घटना घडली आहे. धनेश्वर सत्यनारायण चौधरी रा. अंबड नाशिक आणि मनोज सिंग वय 30 पूर्ण नाव पत्ता माहित नाही. अशी मयत कामगारांची नावे आहेत. त्यांच्या सोबत काम करणारा संजय बाबुराव लोखंडे वय 38 राहणार सातपूर नाशिक असे संशयित आरोपीचे नाव आहे. वैभववाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले आहे.

नाधवडे येथील माळावर नवीन क्रशर जोडणीचे काम सुरु आहे. नाशिक एपीसी इंजिनिअरींग कंपनी येथील सात कामगार १० मार्च पासून काम करीत होते. बुधवारी अक्षयतृतीया असल्यामुळे दुपारपर्यंत काम करून दुपार नंतर वैभववाडी बाजारपेठत येऊन दारू प्याले. आणि सोबत न आलेल्यांसाठी दारू घेऊन गेले. रात्री परत सगळे एकत्र दारू पिऊन जेवण केले. त्यानंतर संशयित आरोपी संजय लोखंडे व मयत धनेश्वर सत्यनारायण चौधरी वय ६६ हे दोघे आपापसात चेस्टामस्करी करीत होते. दरम्यान इतर सहकारी कामगार झोपण्यासाठी गेले. संतोष यादव त्यांच्या रूममध्ये झोपायला गेला. फिर्यादी जयस्वाल हा मोबाईल घेऊन बाहेर झोपला होता. त्यावेळी मयत मनोज सिंग व आरोपी संजय लोखंडे हे चेस्टामस्करी करीत खोलीच्या समोर अंधारात गेले. तेथेच आरोपी लोखंडे यांने मनोज सिंगला चाकूने भोसकून ठार मारले. त्यानंतर आरोपी लोखंडे हा रूम मध्ये झोपलेल्या धनेश्वर चौधरी याच्या पोटावर बसुन छातीवर सपासप चाकूने वार केले. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे चौधरी बचावासाठी जोरात ओरडला. आवाज ऐकूण फिर्यादी विजय शंकर जयस्वाल 45 रा. सावरकर चौक नाशिक हा रूमच्या दिशेने धावत पळत गेला. मात्र रूमचा दरवाजा आतून बंद होता. लाईट चालू होती. रूमच्या मागील बाजूने जात खिडकीत बघितले असता लोखंडे चाकूने वार करत होता. जयस्वाल यांनी इतर सहकाऱ्यांना घेऊन लोखंडे याला रूमचा दरवाजा उघडण्यास सांगितले. रूममध्ये गेल्यावर चौधरी रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. बचावासाठी मदत मागत होता. मॅनेजर संतोष यादव यांनी घडलेली घटना आपल्या कंपनीचे मालक यांना फोन करून सांगितली. तसेच वैभववाडी पोलिसांना सांगितले.

वैभववाडी सहायक पोलिस उपनिरीक्षक सुनील अवसरमोल,, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्री. शेळके, हे. कॉ. संदीप कांबळे, शैलेंद्र कांबळे, अभिजित तावडे, अजय बिलपे, राहुल तळसकर, अजित पडवळ, सूरज पाटील, दिग्विजय काशिद, संदीप राठोड, यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरा कणकवली डीवायएसपी घनश्याम आढाव यांनी घटनास्थळी भेट देऊन घडल्या प्रकाराची चौकशी केली.

आरोपी लोखंडे याने घटनेच्या दोन दिवस अगोदर चाकूला धार काढून ठेवलं होतं. दरम्यान चाकूला धार का काढत आहेस अशी विचारणा सहकारी मित्राने केली. आंबे कापण्यासाठी असे उत्तर लोखंडे याने दिले होते. खूनाच्या घटनेनंतर आरोपी लोखंडे हा सकाळ पर्यंत दारूच्या नशेतच असल्याने आणि विसंगत माहिती देत असल्याने खुनाचे कारण समजू शकले नाही. याबाबत अधिक पोलीस करीत आहेत.

error: Content is protected !!