वैभववाडी : उपळे येथील काजूच्या बागेत हेत येथील जयश्री विष्णू शेरे वय अंदाजे ८५ वर्षे या वयोवृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. मृतदेह मंगळवारी दुपारी ग्रामस्थांच्या निदर्शनास आला. पोलिसांनी घटना स्थळी जाऊन पंचनामा केला आहे.
उपळे बौध्दवाडीनजीक पालांडे यांची काजुची बाग आहे. दोन दिवसापूर्वी या काजूच्या बागेला आग लागली होती. या बागेतून पाण्याची पाईप लाईन गेलेली आहे. आगीमुळे पाईप लाईनचे काही नुकसान झाले आहे का पाहणी करण्यासाठी ग्रामस्थ गेले होते. यावेळी बागेत एक अज्ञात वयोवृद्ध महिला मृतावस्थेत आढळून आली.
ग्रामस्थांनी याबाबत वैभववाडी पोलीस ठाणेत माहिती दिली. माहिती मिळताच वैभववाडी सहाय्यक निरीक्षक सुनील अवसरमोल, पोलीस आर. बी पाटील, उद्धव साबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. दरम्यान त्या मृत महिलेचा मृतदेहाचे फोटो व्हाट्सअप ग्रुपवर व्हायरलं केल्यानंतर त्या महिलेची सायंकाळी उशिरा त्या मृतदेहाची ओळख पटली आहे.
तो मृतदेह हेत शेरेवाडी येथील जयश्री शेरे यांचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना मुलबाळ नव्हते. त्या घरात एकट्याच राहात होत्या. दोन दिवस त्या घरी नव्हत्या.