आडाळी MIDC हद्दीत जमीन सपाटिकरण नावाखाली बेकायदेशीर मायनींग उत्खनन.

महसूल विभागाच्या आशीर्वादाने कोट्यावधी रुपयाची मायनींग तस्करी

दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एमआयडिसित गेले कित्तेक महिने जमीन सपाटी करण करण्याच्या नावाखाली गोवा व जिल्ह्याभरातील खनिज तस्करी करणारे दलाल मोठ्या प्रमाणात दिवस रात्र महसूल विभागाच्या आशीर्वादाने खनीज तस्करी करीत आहेत.

आडाळी एमआयडिसित एमआयडिसिची जमीन सपटीकरण करण्याच्या नावाखाली गेले कित्तेक महिने गोवा राज्यातील दलाल काही स्थानिकांना हाताशी धरून मोठया प्रमाणात मायनिंग काढून बिनधास्त पणे रेडी येथे वाहतूक करीत आहेत.


हजारो डंपर मायनिंगची माती खुलेआम वाहतूक करीत आहेत. या अगोदर ही आडाळी MIDC मधील जमीन सपाटीकरणाखाली मायनींग उत्खलन करून शासनाचा लखो रुपयाचा महसूल बुडून लाखो रुपये ह्या दलालांनी कमवले आहेत.

error: Content is protected !!