पिंगुंळी विभागातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांचा स्नेहमेळावा!

लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या भागात सदैव कार्यरत राहाण्याची धडपड माजी पंचायत समिती सदस्य गंगाराम सडवेलकर करीत आहेत,,,,, शिवसेना नेते अतुल बंगे!

माजी पंचायत समिती सदस्य गंगाराम सडवेलकर गेली पंधरा वर्षे आपल्या पिंगुंळी विभागात प्राथमिक शिक्षक व विद्यार्थी यांचा स्नेह मेळावा निस्वार्थी पणे घेत आहेत हा त्यांचा उपक्रम जिल्ह्यातील पहिला उपक्रम आहे असे गौरवोद्गार शिवसेनेचे नेते अतुल बंगे यांनी काढले

माजी पंचायत समिती सदस्य गंगाराम सडवेलकर यांच्या संकल्पनेतून जि प प्राथमिक शाळेचे विद्यार्थी व शिक्षक यांचा स्नेह मेळावा भवानी मंगल कार्यालय काळेपणी येथे श्री बंगे यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच संपन्न झाला.

यावेळी श्री बंगे बोलताना म्हणाले श्री सडवेलकर ही व्यक्ति स्वखर्चाने असे उपक्रम राबवुन विद्यार्थी व शिक्षक यांच्यामध्ये एकप्रकारे प्रोत्साहन देत असुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असा उपक्रम लोक प्रतिनिधी म्हणून गंगाराम सडवेलकर हेच एकमेव लोक प्रतिनिधी राबवत आहेत या बाबत खरोखरच कौतुकास्पद बाब आहे असेही श्री बंगे म्हणाले.


यावेळी लक्ष्मण परब सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक, विलास परब सेवा निवृत्त माध्यमीक शिक्षक, सौ विणा परब, धोंडु रेडकर, वासुदेव मराठे यांचा सन्मान करण्यात आला तर गोवेरी, वाडीवरवडे, पिंगुंळी, काळेपणी या शाळेतील गुणवत्ता विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रम श्री गणेश गंगाराम सडवेलकर निवृत्त मुख्याध्यापक आणि सडवेलकर परीवार पुरस्कृत करण्यात आला होता.


यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे अतुल बंगे, ग्रामपंचायत सदस्या अन्वई बांदेकर, ग्रामपंचायत सदस्य भरत परब, ग्रामपंचायत सदस्य तुळशीदास पिंगुळकर, माजी पंचायत समिती सदस्य गंगाराम सडवेलकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक धुरी, दीपक गावडे, केंद्र प्रमुख श्री चव्हाण, केंद्र प्रमुख श्री परुळेकर, माजी केंद्र प्रमुख मराठे, मुख्याध्यापक राजा कविटकर, माजी सेवा निवृत्त शिक्षक श्री परब, शिवसेनेचे काराणे, श्री खान, सेवा निवृत्त केंद्र प्रमुख धोंडु रेडकर आदी उपस्थित होते यावेळी सर्व शाळांचे शिक्षक उपस्थित होते.

error: Content is protected !!