महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत प्रशालेचे उज्वल यश
०९ फेब्रुवारी २०२५ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत प.पू. आप्पासाहेब पटवर्धन माध्य विद्यालय मांडकुली- केरवडे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले आहे. इयत्ता आठवीतील कुमार गणपत लक्ष्मण घाडी व कुमार मयूरेश कृष्णा भोई उत्तीर्ण झाले आहेत .
त्यांना मार्गदर्शन करणारे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री सुरेंद्र खोत श्री अनिल गोवेकर सौ प्रज्ञा रांगणेकर मॅडम व श्री राहुल कानडे या सर्व शिक्षकांचे संस्था अध्यक्ष श्री. श्रीधर पेडणेकर, संस्था सचिव श्री. अंकुश जाधव, खजिनदार श्री. देवदत चुबे, संस्था उपाध्यक्ष श्री. अर्जून परब, कार्याध्यक्ष श्री. वामन गावडे व सर्व संचालक, सभासद ,ग्रामस्थ, माजी विद्यार्थी, पालक,व सर्व शिक्षणप्रेमी यांजकडून अभिनंदन होत आहे.