मालवण तालुक्यातील हेदूळ – खोटले या गावामध्ये गेले ३ ते ४ महिने नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढावा अन्यथा उपोषणाचा इशारा हेदुळ गावचे माजी सरपंच नंददीपक गावडे यांनी दिला आहे.
मालवण तालुक्यातील हेदूळ, खोटले, वायंगवडे या गावात नेटवर्कची समस्या उद्भवली आहे. त्यामुळे या गावातील ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा एखादी इमर्जन्सी असेल किंवा आरोग्यविषयक समस्या असेल तर नेटवर्क उपलब्ध नसल्यामुळे संपर्क होत नाही. अनेकदा महिन्याभराचे रिचार्ज करून देखील नेटवर्क उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांचे आर्थिक नुकसान होत. या समस्येकडे तत्काळ लक्ष देऊन समस्येचे निराकरण करण्यात यावे अन्यथा उपोषण करण्यात येईल असा इशारा हेदुळ गावचे माजी सरपंच नंददीपक उर्फ नंदू गावडे यांनी दिला आहे.