कुडाळ : नेरूर उबाटा शिवसेना गटाचा बालेकिल्ला. आमदार वैभव नाईक यांच्या प्रचारार्थ नेरूर विभाग क्रमांक 215 आणि वार्ड क्रमांक 5. नेरूर गावामध्ये प्रचार करताना युवकांचा प्रचार दरम्यान तसेच आमदार वैभव नाईक समर्थक शिवसेना युवासेना कार्यकर्ते पदाधिकारी जोमाने आमदार वैभव नाईक यांचा प्रचार व प्रसार आणि मतदारांना मार्गदर्शन प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन करत होते. यामध्ये मतदारांचा योग्य असा प्रतिसाद प्रचाराच्या दरम्यान दिसून आला. यावेळी नेरूर ग्रामपंचायत माझी सरपंच शेखर गावडे, युवासेना उपतालुकाप्रमुख विनय गावडे, नेरूर ग्रामपंचायत सदस्य गणेश गावडे,शंभू नाईक, माझी ग्रामपंचायत सरपंच सुनील गावडे, माझी ग्रामपंचायत सदस्य प्रसाद गावडे, रामा कांबळी, भूषण गावडे, प्रथमेश गावडे, बंटी, काका गावडे, अक्षय, केदार, तुषार, बाळा, सचिन, अमित, मंदार, रितेश तसेच शिवसेना युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.