शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर यांच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
कुडाळ : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी आ. वैभव नाईक यांना जोरदार धक्का दिला असून बांबुळी येथे उबाठा सेनेतील असंख्य कार्यकर्त्यांनी धनुष्यबाण हाती घेतला.
यावेळी गणेश तुकाराम तेली, संतोष जगन्नाथ तेली, गौरेश गणेश तेली, भूषण गणेश तेली, गीतांजली गणेश तेली, प्रथमेश विश्राम तेली, विश्राम पांडुरंग तेली, वैशाली विश्राम तेली, पुनम विश्राम तेली, वसंत तुकाराम तेली, विनिता वसंत तेली, वैभव वसंत तेली, विराज वसंत तेली, कुसुम वसंत तेली, रमण विश्राम तेली, विशाखा विष्णू तेली, विष्णू सीताराम तेली, वैष्णवी विष्णू तेली, अक्षता संतोष तेली, विमल विष्णू तेली, श्रीकृष्ण तुकाराम तेली, राधिका श्रीकृष्ण तेली, महेंद्र मधुकर बांबुळकर, मयुरी महेंद्र बांबुळकर, शंकर काशिनाथ परब, सुवर्णा शंकर परब, सुशांत शंकर परब आदी ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, तालुकाप्रमुख अरविंद करलकर, विनायक राणे आदी उपस्थित होते.