सिंधुदुर्ग तसेच रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर आजपासून प्रतिकिलो दहा रुपये या दराने अनुदान जमा झाले आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल सर्व काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने शासनाचे मन:पूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
कोकण व कोल्हापूर परिसरातील काजू लागवड केलेल्या शेतकऱ्यांना गोवा राज्याच्या धर्तीवर भावांतर योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. या मागणीचा पाठपुरावा श्री. प्रमोद जठार यांनी सातत्याने केला. त्यांच्या या प्रयत्नांना यश येत अखेर शासनाने काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी २०,००० रुपये अनुदान मंजूर केले.
२०२५ या वर्षी राज्यातील सुमारे २,००० काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान जमा झाले आहे. या योजनेच्या अंमलबजावणीत मा. मंत्री श्री. नितेश राणे, श्री. रविंद्र चव्हाण तसेच तत्कालीन मंत्री श्री. अब्दुल सत्तार यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांच्या योगदानाबद्दल शेतकरी वर्ग त्यांचे आभार मानतो.
या यशस्वी प्रयत्नात सिंधुदुर्ग फळबागातदार संघाचे अध्यक्ष श्री. विलास सावंत यांचे देखील मोलाचे योगदान लाभले असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचेही मन:पूर्वक आभार.