नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांच्या पाठपुराव्याला यश
कुडाळ : कुडाळ पोलिस स्टेशन ते आर. एस. एन. मुख्य रस्ता मजबुतीकरणाच्या कामाला अखेर सुरुवात झाली असून यामुळे प्रवाशांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्याची पार दुरावस्था झाली होती. त्यामुळे वाहनांना या रस्त्यावरून वाहने हाकताना तारेवरची कसरत करावी लागत होती.
कुडाळच्या नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे लक्ष वेधल्यानंतर अवघ्या काही दिवसात या कामाला सुरुवात करण्यात आली. यामुळे सर्वसामान्य जनतेमधून समाधान व्यक्त केले जात आहे