काय आहेत निकष; कोणाचे रेशन कार्ड बंद होणार:जाणून घ्या
ब्युरो न्यूज: बांगलादेशी देशी लोकांची घुसखोरी आणि राज्यात येऊन मिळवलेली स्थानिक मालमत्ता या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आता महाराष्ट्र सरकारने महत्वाचे निर्णय घेतले आहेत.महाराष्ट्र शासनाने आपल्या नवीन GR नुसार महाराष्ट्रातील निकषात न बसणाऱ्या अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम सुरु केलेली आहे.
अपात्र शिधापत्रिकांचा शोध
या नुसार महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या अपात्र शिधापत्रिका शोधून त्या रद्द करण्यात येणार आहेत.आणि साबंधीताच्या मागणीनुसार नवीन शिधापत्रिका देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे.उपलब्ध असलेला शिधापत्रिकेचा कोठा पूर्ण होत असल्यामुळे नवीन लाभार्थ्यांना रेशन कार्ड उपलब्ध करून देणे शक्य होणार नाही, त्यामुळे अपात्र असलेली शिधापत्रिका प्राधान्याने वगळण्याची प्रक्रिया महाराष्ट्रात राबविली जाणार आहे. यामुळे नवीन लाभार्थ्यांना रेशन कार्ड देणे शक्य होणार आहे.केंद्र शासनाकडून यापूर्वी प्राप्त झालेल्या निर्देशानुसार अपात्र शिधापत्रिकांचा शोध घेऊन अशा शिधापत्रिका रद्द करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना वेळोवेळी देण्यात आल्या आहेत.
सद्यस्थितीत राज्यात देण्यात आलेल्या अंत्योदय, प्राधान्य कुटुंब लाभार्थी (केशरी) व शुभ्र या सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी करण्यासाठी दरवर्षी दि.०१ एप्रिल ते दि.३१ मे या कालावधीमध्ये शोध मोहिम राबविण्यात यावी.
पहिल्या टप्प्यातील कामे
• सुरवातीला सध्याच्या शिधापत्रिकाधारकांकडून माहिती घेण्यात येईल.
• यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यात येईल.
• या फॉर्म सोबत शिधापत्रिकाधारकांनी निवासस्थानाच्या मालकीबद्दलचा पुरावा, LPG जोडणी क्रमांक बाबत पावती, बँक पासबुक, विजेचे देयक, टेलिफोन/मोबाईल देयक, ड्रायव्हिंग लायसन्स, ओळखपत्र (कार्यालयीन/इतर), मतदार ओळखपत्र, आधार कार्ड इत्यादीच्या प्रती घेता येतील. दिलेला वास्तव्याचा पुरावा हा एक वर्षापेक्षा जास्त कालावधीपेक्षा जुना नसावा
.• अर्ज भरल्यानंतर संबंधित कागदपत्रे जोडून स्थानिक दुकानदाराकडे जमा करावेत.दुसऱ्या टप्प्यातील कामे
• दुसऱ्या टप्प्यात संबंधित अर्जाची, अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची शहानिशा किंवा तपासणी केली जाईल.
• या अर्जात किंवा जोडलेल्या कागदपत्रांत त्रुटी असतील तर ते जमा करण्यास सांगितले जाईल.
• शिधापत्रिका धारकांना यासाठी १५ दिवसांची मुदत दिली जाईल.
• या कालावधीत कागदपत्रांची पूर्तता न केल्यास शिधापत्रिका रद्द केली जाईल.तिसऱ्या टप्प्यातील कामे
• या टप्प्यात विशेष काळजी घेऊन एका कुटुंबात एकच शिधापत्रिका दिली जाईल, अशी तपासणी केली जाईल.
• विदेशी नागरिकांना एकही शिधापत्रिका दिली जाणार नाही, याची दक्षता घेतली जाईल.
• अर्जदाराच्या उत्पन्नानुसार शिधापत्रिका देण्यात येईल.
• या मोहीमेतून दुबार, अस्तित्वात नसलेल्या, मयत व्यक्ती या लाभार्थ्यांना वगळण्यात येईल.













