“राधाकृष्ण चषक २०२५” या सांगितिक महोत्सवाअंतर्गत ‘शास्त्रीय गायन स्पर्धा(हिंदुस्थानी ख्याल)’ व ‘सवेष साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धा’

‘श्री राधाकृष्ण संगीत साधना सिंधुदुर्ग’ या संस्थेच्या वतीने व ‘स्वयंभू कला क्रीडा मंडळ, आजगांव’ यांच्या सहकार्याने आयोजन

वेंगुर्ला : जिल्ह्यातील शास्त्रीय संगीत क्षेत्रात काम करणाऱ्या ‘श्री राधाकृष्ण संगीत साधना सिंधुदुर्ग’ या संस्थेच्या वतीने व ‘स्वयंभू कला क्रीडा मंडळ, आजगांव’ यांच्या सहकार्याने सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हा मर्यादित “राधाकृष्ण चषक २०२५” या सांगितिक महोत्सवाअंतर्गत ‘शास्त्रीय गायन स्पर्धा(हिंदुस्थानी ख्याल)’‘सवेष साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धा’ चे आयोजन करण्यात आले आहे. हि स्पर्धा सोमवार दि. २८ एप्रिल व मंगळवार दि. २९ एप्रिल २०२५ रोजी आजगांव येथील श्री देव वेतोबा मंदिर सभागृहात संपन्न होणार आहे. तळकोकणातील शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या उदयोन्मुख कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे व त्यांना प्रोत्साहित करावे या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन केले. गेल्या सहा वर्षांच्या यशस्वी आयोजननंतर स्पर्धेचे हे सातवे वर्ष आहे. शास्त्रीय संगीत स्पर्धा खुल्या गटांत तर सवेष साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धा छोटा गट व मोठा गट अश्या दोन गटात आयोजित केली आहे. स्पर्धेसाठी आकर्षक पारितोषिके व सन्मानचिन्हे ठेवण्यात आली असून सर्व सहभागी स्पर्धकांना सन्मा. परिक्षक महोदयांच्या स्वाक्षरीची प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी श्री. हेमंत दळवी ९४२३५८५७९२ / सौ. वीणा दळवी ९४२३८१९०९२ यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!