श्री सातेरी मंदिर तळगाव खांदवाडी येथे हायमास्ट

प्रभाकर सावंत यांचे विशेष सहकार्य

मालवण : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर श्री सातेरी मंदिर तळगाव खांदवाडी येथे हायमास्ट बसवण्यात आला. जिल्हा नियोजनच्या माध्यमातून निधी मिळवून देण्यासाठी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी विशेष सहकार्य केले. तसेच अक्षय दिगंबर दळवी व दत्तू सावंत यांनी देखील यासाठी प्रयत्न केले. या हायमास्टमुळे मंदिर परिसर प्रकाशमय झाला आहे. याबद्दल भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचे आभार मानले.

error: Content is protected !!