स्वामी समर्थ महाराज मठ माड्याचीवाडी येथे कलश पूजन व मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा

श्री 108 महंत मठाधीश परमपूज्य सद्गुरू श्री गावडे काका महाराजांची संकल्पना

कुडाळ : श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने अध्यात्मिक सद्गुरु श्री श्री 108 महंत मठाधीश परमपूज्य सद्गुरू श्री गावडे काका महाराजांच्या संकल्पनेतून माड्याचीवाडी, खालचीवाडी कुडाळ या पुण्यभूमीत कलश पूजन आणि मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा दिनांक 27 मार्च 2025 ते 6 एप्रिल 2025 रोजी कार्यक्रम संपन्न होत आहे .

अवघ्या तीन महिन्यात मंदिर बांधकाम पूर्ण झाले असून कृष्णाशीला दगडामध्ये श्री स्वामी समर्थाची चैतन्यरूपी मूर्ती साकारली आहे .या सोहळा मध्ये अनेक धार्मिक विधी महाप्रसाद व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले असून सर्व भाविकांनी उपस्थित राहून श्री चा कृपाशीर्वाद घ्यावा ही विनंती.

कार्यक्रम पुढील प्रमाणे गुरुवार दिनांक 27 मार्च 2025 रोजी सायंकाळी उदक ,शांती गणहोम

रविवार 30 मार्च 2025 रोजी सायंकाळी 4.00 ते रात्री 8.00 वाजता श्री स्वामी समर्थांच्या मूर्तींचे ढोल पथकासह भव्य मिरवणूक श्रीदेव गावडोबा मंदिर ते स्वामी मंदिर माडाचीवाडी ,
रात्रौ 8 .30वाजता स्वामींच्या मूर्तीचा धान्य अधिवास .

सोमवार दिनांक 31 मार्च 2025 रोजी सकाळी 7 वाजता स्वामी प्रगट दिन ,स्वामी पादुकानवर अभिषेक , सकाळी 8.30 वाजता देवतांना निमंत्रण ,स्वस्ती वाचन ,सभा दान, जल अधिवास, आचार्यवरण ,पीठ देवता स्थापना, व पूजन
दुपारी 1.30 वाजता महाप्रसाद सायंकाळी,4 ते 7 वाजता पालखी मिरवणूक सोहळा ढोल पथकासह श्री स्वामी समर्थ मठ ते श्री देव गावडोबा मंदिर

मंगळवार दिनांक 1 एप्रिल 2025 रोजी सकाळी 8.30 वाजता आवाहीत देवता पूजन, होमवन ,प्राकार कौशल्य पर्याहवन,दुपारी 1.30 वाजता महाप्रसाद ,सायंकाळी 4.00वाजता श्रीदेवी चामुडेश्वरी महिला फुगडी ग्रुप कवील कट्टा (कुडाळ) आम्ही चार चौकी महिला ग्रुप ओरोस यांची पारंपरिक फुगडी नृत्य,रात्र 8.00 वाजता वावळेश्वर दशावतार नाट्य मंडळ तेंडोली यांचा महान पौराणिक ट्रिक्सीनयुक्त नाट्य प्रयोग अयोध्याधीशी श्रीराम हा नाट्य प्रयोग सादर होणार आहेत

बुधवार 2 एप्रिल 2025 सकाळी 8.30 वाजता कलश पूजन व श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना, दुपारी 1वाजता महाआरती व महाप्रसाद ,सायंकाळी 6:00 वाजता महापुरुष प्रासादिक भजन मंडळ माड्याचीवाडी बुवा ऋषिकेश गावडे यांना पखवाज वादक म्हणून लक्ष्मण गावडे तर म्हणून तबलावादक पवन गावडे
तसेच श्री देव रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ पिंगळी बुवा रुपेश यमकर यांना पखवाज वादक म्हणून शुभम गावडे व तबलावादक म्हणून अमन सातार्डेकर ,व भगवती प्रसादीक भजन मंडळ बाव बुवा लक्ष्मण नेवाळकर यांना पखवाज वादक म्हणून विराज बावकर तर तबलावादक ओंकार राऊळ या भजनी बुवांचे सुश्राव्य भजने सादर होणार आहेत

गुरुवार दिनांक 3 एप्रिल 25 रोजी सकाळी 9 वाजता सामुदायिक अभिषेक, 1वाजता महाआरती व महाप्रसाद ,4 वाजता. महिलांसाठी पाककला स्पर्धा, 6 वाजता गवळीवाडी भजन मंडळ कारिवडे भजन सम्राट बुवा मयूर गवळी यांचें सुश्राव्य भजन,रात्रौ 8 वाजता प्रसिद्ध कीर्तनकार श्री हरिहर नातू पुणे यांचे कीर्तन सादर होणार आहे यांना हार्मोनियम म्हणून स्वप्निल गोरे ,तबला श्री किशोर सावंत ,पखवाद गौरव पिंगुळकर

शुक्रवार दिनांक 4 एप्रिल 2025 सकाळी 9 वाजता सामुदायिक अभिषेक, दुपारी 1 वाजता महाआरती व महाप्रसाद रात्री आठ वाजता लिंगेश्वर प्रसादीक भजन मंडळ भरणी कुडाळ ,संगीत भजन सम्राट बुवा श्री विनोद चव्हाण, गुरुवर्य स्वर्गीय चिंतामणी बुवा पांचाळ पखवाज वादक श्री तुषार लोट तर तबला श्री शिवराज पोईपकर , व हनुमान प्रासादिक भजन मंडळ वर्दे कुडाळ संगीत भजन सम्राट बुवा श्री गुड्डू सावंत, गुरुवर्य श्री अशोक सावंत बुवा ,पखवाज विराज बावकर ,तबला संकेत गोसावी , या दोन बुवा मध्ये डबलबारी सामना होणार आहे

शनिवार 5 एप्रिल 2025 सकाळी 10 वाजता श्री सत्यनारायण महापूजा दुपारी 1 वाजता महाआरती व महाप्रसाद , सायंकाळी 6.30 वाजता स्वर बंदिश प्रासादिक भजन मंडळ वेंगुर्ला बुवा अक्षय तांडेल यांचे सुश्राव्य भजन
रात्रौ 8 वाजता चिमणी पाखरं डान्स अकॅडमी कुडाळ आयोजित नृत्याविष्कार ,

रविवार दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी श्री श्री 108 मठाधीश परमपूज्य सद्गुरु श्री गावडे काका महाराज वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा सकाळी 11 वाजता औक्षण व संस्थेच्या शुभेच्छा स्वीकार ,11.30 वाजता सत्कार सोहळा व बक्षीस वितरण सोहळा ,दुपारी 12 वाजता सद्गुरु श्री गावडे काका महाराजांचे मार्गदर्शन ,दुपारी 1ते राञौ 10 पर्यंत सद्गुरु दर्शन व आशीर्वाद सोहळा ,दुपारी 1 .30 वाजल्यापासून अखंड महाप्रसाद ,दुपारी 3 वाजता सद्गुरु संगीत विद्यालय सावंतवाडी भक्ती गायन स्पर्धा असे विविध कार्यक्रम होणार आहेत तरी स्वामी भक्तांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा

error: Content is protected !!