आता देवगडमधील हापूस आंब्यावर असणार यूआयडी बारकोड

देवगड: आंबा म्हटल की कोकणातील देवगडच्या हापूस आंब्याची चव जिभेवर रेंगाळते.देवगडचा हापूस आंबा म्हणजे आंब्याचा राजा आहे. मात्र आजकाल बाजारात देवगडचा हापूस आंबा म्हणून बहुतेक वेळा कर्नाटक वरून आलेल्या आंब्याची विक्री केली जाते. ग्राहकांची ही फसवणूक टाळण्यासाठी एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. देवगड हापूसच्या नावाने ग्राहकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी या वर्षीपासून आंब्यावर यूआयडी बारकोड बसवण्यात येणार आहेत.देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने हा उपक्रम हाती घेतला आहे.

५० लाख बारकोड स्टिकरचे वितरण

यानुसार मुंबई बाजार समितीमध्ये बारकोड असलेल्या आंब्याची आवक सुरू झाली आहे. गुरुवारी असे २०० डजन आंबा दाखल झाला असून, यामुळे आता ग्राहकांची फसवणूक टळणार आहे. कोकणातील देवगड हापूस आंब्याची मागणी जगभरात आहे. मात्र बाजारात बऱ्याचदा कर्नाटकचा आंबाही देवगड हापूसच्या बॉक्समध्ये भरून विक्री केला जातो. देवगड हापूस आंबा कोणता आणि दक्षिणेकडील राज्यातून येणारा हापूससदृश आंबा कोणता, हे ग्राहकांना पटकन ओळखता येत नाही. हा प्रकार टाळण्यासाठी देवगडमधील हापूस आंब्यावर यूआयडी बारकोड बसविण्यास सुरुवात केली आहे. देवगडमध्ये संघटनेच्या माध्यमातून ५० लाख बारकोड स्टिकरचे वितरण करण्यात आले आहे. या स्टिकरवर स्कॅन केल्यानंतर आंब्याची सर्व माहिती उपलब्ध होणार आहे.

error: Content is protected !!