आ. निलेश राणे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

शिवसेना कुडाळ यांचे आयोजन

कुडाळ : कुडाळ – मालवणचे आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. कुडाळ बस स्थानक येथे प्रवाशांना मिठाईवाटप करण्यात आली. तर महिला व बाल रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम पार पडला. तर कुडाळ नगरपंचायत मधील सफाई कर्मचाऱ्यांना एक किलो साखर व एक किलो रवा असे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी नगरपंचायत च्या पन्नास कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्ष प्राजक्ता शिरवलकर, नगरसेविका नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, गणेश भोगटे, शिवसेना शहर प्रमुख रोहित भोगटे, रेवती राणे, चंदन कांबळी, राकेश वर्दम, श्रुती वर्दम, प्रसन्न गंगावणे, निलेश शिरसाट, अविनाश पाटील तसेच मोठ्या संख्येने शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष प्राजक्ता शिरवलकर तसेच नगरसेवक यांच्या उपस्थितीत कुडाळ एसटी स्टँड वरील प्रवाशांना मिठाई वाटप केले. त्याबाबत उपस्थित प्रवाशांमधून समाधान व्यक्त करण्यात आले. महिला व बाल रुग्णालय येथे संजय पडते यांच्या उपस्थितीत रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. नगराध्यक्ष प्राजक्ता शिरवलकर यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ नगरपंचायत येथे 50 सफाई कर्मचाऱ्यांना साखर व रवा वाटप करण्यात आले. यावेळी नगरपंचायत मधील अधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थित होते. शिवसेना कुडाळ शहर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या समाज उपयोगी कार्यक्रमाबाबत कुडाळ शहरात जनतेमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

error: Content is protected !!