कणकवली : शहरात शुक्रवार १४ मार्च रोजी सकाळी बाजारपेठेतील महापुरुष कॉम्प्लेक्सच्या पाठीमागील इमारतीलगत आढळलेल्या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. सुमारे ३० ते ३५ वयोगटातील युवकाचा हा मृतदेह कुजलेल्या स्थितीत होता. इमारतीच्या ड्रेनेज पाईप व अडगळीच्या ठिकाणी सदरच्या युवकाचा मृतदेह टेकून बसलेल्या स्थितीत होता. सदरच्या युवकाच्या अंगावर निळी फूल ट्रॅक पँट, काळे फूल हाताचे गोल गळ्याचे टीशर्ट आहे. युवकाच्या डाव्या मनगटावर इंग्लीशमध्ये कॅपिटल ‘एमपीआर’ असे गोंदलेले आहे. युवकाचा मृतदेह सुमारे दोन ते तीन दिवस तेथे असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे. सदरच्या युवकाबाबत कोणाला माहिती असल्यास पोलीस स्थानकाशी संपर्क साधावा, असे आवाहन तपासीक पोलीस उपनिरीक्षक एस. जी. देठे यांनी केले आहे.

Subscribe










