हुमरमळा येथे बांधण्यात आलेल्या नुतन संत रविदास भवन इमारतीचा उद्घाटन सोहळा

मालवण कुडाळ मतदार संघाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या शुभहस्ते

संतोष हिवाळेकर

सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्ग संचलित संत रविदास भवन इमारत उद्घाटन सोहळा व संत रोहिदास समाज भूषण पुरस्कार वितरण , स्पर्धा बक्षीस वितरण ,संस्थेचा 41 वा वर्धापन दिन, विशेष कार्य समाजबांधव गौरव, व स्मरणिका प्रकाशन समारंभा रविवार दिनांक 16 मार्च 2025 रोजी सकाळी ठीक 10.00 वाजता संत रविदास भवन हुमरमळा ,तालुका .कुडाळ येथे आयोजित करण्यात आला आहे

या संत रविदास भवन इमारत प्रथम टप्पा माजी आमदार वैभव नाईक यांच्या स्थानिक विकास निधीतून पूर्ण झाला आहे.सदर प्रथम टप्प्याचा उद्घाटन सोहळा मालवण कुडाळ मतदार संघाचे माजी आमदार वैभवजी नाईक साहेब यांच्या शुभहस्ते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव ,
प्रमुख उपस्थिती हुमरमळा सरपंच समीर पालव, उपसरपंच संचिता पालव, माजी सरपंच जान्हवी पालव , माजी सरपंच महानंदा बांदेकर,कुडाळ पंचायत समिती माजी सदस्या सुप्रिया वालावलकर, मार्गदर्शक ॲड.अनिल निरवडेकर, मार्गदर्शक विजय चव्हाण, उद्योजक मुंबई संजय चव्हाण, जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे, यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे .

तसेच निमंत्रक म्हणून जिल्हा कार्यकारणी जिल्हा कोषाध्यक्ष नामदेव जाधव,उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण,दीपक समजीसकर,उत्तम चव्हाण,ज्ञानेश्वर तळकटकर यांसह सर्व संचालक मंडळ व जिल्हा कार्यकारणीतील निवडण्यात आलेल्या सर्व समित्याचे सदस्य आणि सर्व तालुक्यातील तालुकाअध्यक्ष व पदाधिकारी हे उपस्थित राहणार आहेत तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व चर्मकार बांधवांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे ही विनंती.

error: Content is protected !!