राजापूर प्रतिनिधी: राजापूर शहरातील युवा छायाचित्रकार संदेश टिळेकर यांनी ११ नोव्हेंबर १९९८ रोजी राजापूर शहरातील मुख्य बाजारपेठत टिळेकर फोटो स्टुडिओयानावाने फोटो स्टुडिओ स्थापन केला या फोटो स्टुडिओला सोमवार दि.११ नोव्हेंबर २०२४ रोजी २६ वर्ष पूर्ण होत आहेत यानिमित्त संदेश टिळेकर यांनी टिळेकर डिजिटल फोटो स्टुडिओच्या २६ व्या वर्धापनदिनानिमित्त श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन केले आहे तरी सर्व ग्राहक हितचिंतक आप्तेष्ट नातेवाईक मित्र परिवार यांनी तिर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा व आम्हाला पुढिल वाटचालीला शुभाशीर्वाद देण्यासाठी आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन छायाचित्रकार संदेश टिळेकर यांनी आमचे न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले.

राजापूर शहरात अतिशय प्रतिकूल परिस्थितीत संदेश टिळेकर यांनी आपला टिळेकर फोटो स्टुडिओ राजापूर बाजारपेठेत सुरू केला आणि या फोटो स्टुडिओला हा हा म्हणता २६ वर्ष केव्हा झाली हे समजलेच नाही.संदेश टिळेकर यांच्या फोटोग्राफीची सुरवात त्यावेळच्या कॄष्णधवल व म्यॅन्युअल कलर फोटोग्राफीने झाली.जस जसे फोटोग्राफीत बदल होत गेले तसतसे संदेश टिळेकर यांनी आपल्या फोटोग्राफीत वेगवेगळे बदल घडवून आणले.आजही ते बदलत्या डिजिटल युगात मिररलेस कॅमेऱ्याद्वारे उत्कृष्ट ट्रेडिशनल, कॅन्डिड , सिनेमॅटिक,प्रिवेडिंग पोस्ट वेडिंग यांसारख्या क्षेत्रात ते पारंगत आहेत.संदेश टिळेकर यांनी निव्वळ फोटोग्राफी विषय आपल्या पुरता मर्यादित न ठेवता बरोबरील सहकारी फोटोग्राफर यांना त्यांनी फोटोग्राफीचे धडे दिले आज त्यांचे अनेक सहकारी फोटोग्राफर स्वमालकिचे फोटो स्टुडिओ घालून स्वतःचा उदरनिर्वाह चालवत आहेत.

तसेच त्यांनी आपल्या सहकारी फोटोग्राफर व्हिडीओग्राफर यांना सोबत घेऊन फोटोग्राफर व्हिडीओग्राफर यांचे मजबूत संघटन उभे केले व २०१६ रोजी फोटोग्राफर व्हिडीओग्राफर असोसिएशन राजापूर तालुका या नावाने त्यांनी सर्व राजापूर तालुक्यातील सहकारी प्रोफेशनल फोटोग्राफर यांचे सहकार्याने रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली फोटोग्राफर व्हिडीओग्राफर असोसिएशन स्थापन केली व त्याचे ते संस्थापक अध्यक्ष झाले व आज हिच संघटना अतिशय कमी कालावधीत फोटोग्राफर व्हिडीओग्राफर यांचेसाठी विविध फोटोग्राफी कार्यशाळा व सामाजिक उपक्रम राबविल्यामुळे महाराष्ट्र राज्यात हि असोसिएशन अतिशय नावलौकिक झाली .संदेश टिळेकर हे सध्या रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर व्हिडीओग्राफर असोसिएशनचे जिल्हा संघटक म्हणून ते काम पहातात.













