एक हात मदतीचा या उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील गरजू व्यक्तींना मदत करून जपली सामाजिक बांधिलकी
कुडाळ : झाराप तिठा मित्र मंडळ आपल्या एक हात मदतीचा या उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील गरजू व्यक्तींना सलग चार वर्षे मदतीचा हात देत आहेत झाराप तिठा मित्र मंडळा कडून दरवर्षी दशावतारी नाटकाचे आयोजन केले जाते व या माध्यमातून जमणारी देणगी रुपी रक्कम मंडळाकडून निर्धारित केलेल्या समाजातील गरजू कुटुंबाला दिली जाते या उपक्रमाची सुरुवात मंडळाकडून 2022 साला पासून करण्यात आली या मध्ये
१) सन २०२२ मध्ये तृप्ती बांदिवडेकर यांच्या किडनी शस्त्रक्रियेसाठी मदत केली.
२) सन २०२३ मध्ये मंगेश राणे यांना मुलांच्या शिक्षणासाठी मदत केली.
३) सन २०२४ मध्ये तेर्सेबांबर्डे येथील मनोहर सडेकर यांना घर बांधून दिले.
या गरजू व्यक्तींना मदत केली या वर्षीही मंडळाकडून दिनांक १-०३-२०२५ रोजी झाराप तिठा येथे श्री दत्त माऊली दशावतार नाट्य मंडळ यांच्या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाकरिता उपस्थित मान्यवर झाराप सरपंच सौ. दक्षता मेस्त्री, तेर्सेबांबर्डे सरपंच श्री रामचंद्र परब, साळगाव उपसरपंच श्री साळगावकर, तेर्सेबांबर्डे पोलीस पाटील श्री रमाकांत जाधव, तेर्सेबांबर्डे माजी तंटामुक्ती अध्यक्ष श्री अंकुश साटेलकर, श्री धुरी, श्री. घाडी काका, श्री दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळ प्रतिनिधी या सर्व मान्यवरांचे मंडळातर्फे स्वागत केले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, दिपप्रज्वलन, श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले या नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून जमणाऱ्या देणगीरुपी रकमेच्या माध्यमातून या वर्षी नाग्या महादू निवासी वसतिगृह मु. पो. वेताळबांबर्डे, कदमवाडी, ता. कुडाळ येथील आदिवासी व कातकरी मुलांच्या उज्वल भविष्यासाठी एक हात मदतीचा या उपक्रमातून मदत करण्यात आली.
आपण काहीतरी समाजाचे देणे लागतो या भावनेने झाराप तिठा मित्र मंडळ यांच्या माध्यमातून एक हात मदतीचा उपक्रम राबवला जात आहे मंडळा कडून समाजाबद्दल आपल्या कामातून कृतघ्नता व्यक्त केली जात आहे या मंडळाच्या कार्यामुळे समाजातील सर्व माध्यमातून या सामाजिक उपक्रमाकरिता झटणाऱ्या तसेच समाजासमोर एक चांगला आदर्श निर्माण केलेल्या मंडळातील सर्व सदस्यांचे या मध्ये श्री समीर हळदणकर, श्री वैभव कांदे, श्री हेमंत फणसेकर, श्री सुधीर कनियाळकर, श्री विलास डिचोलकर, श्री अक्षय लाड, श्री जगल विश्वकर्मा, श्री बाळा मांजरेकर बंधू, श्री पांडुरंग डिचोलकर, श्री अमृत तातावडे, श्री संदीप दळवी, श्री महादेव हुमरसकर, श्री राकेश पवार बंधू, अनु तावडे, श्री निलेश डगरे तसेच मंडळाला मदत करणाऱ्या व्यक्तींचे कौतुक केले जात आहे.
या आयोजित कार्यक्रमादरम्यान अतिशय सुंदर अशा सूत्रसंचालनाच्या माध्यमातून मंडळाकडून ज्या दात्यांनी या उपक्रमाकरिता मदत केली त्या सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले तसेच उपस्थितीतांना भविष्यामध्ये या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमाकरिता मदत करण्याचे आवाहन करण्यात आले.













