सृष्टी परिवर्तन फाऊंडेशन सिंधुदुर्ग यांच्या वतीने भव्य मोफत शिलाई मशीन वाटप

सिंधुदुर्ग : रविवार दिनांक १ मार्च २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता सृष्टी परिवर्तन फाऊंडेशन सिंधुदुर्ग यांच्या वतीने दिवंगत हौसाबाई बंडू आठवले, सकुताई आठवले महिला रोजगार संघ मार्फत भव्य मोफत शिलाई मशीनच्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला आ. निलेश राणे, युवराज लखमराजे भोसले (भाजप, युवामोर्चा उपाध्यक्ष, महाराष्ट्र), अरुण कुमार जैन (रिजनल मॅनेजर, एस.बी.आय., रत्नागिरी) प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत.

तेव्हा सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

आयोजक : रतनभाऊ कदम (संस्थापक अध्यक्ष, आर. पी. आय. नेते.)

स्थळ : इच्छापूर्ती मंगल कार्यालय, गोविंद सुपर मार्केटच्या मागे, ओरोस

error: Content is protected !!