आधी मारले; मग पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न

सावंतवाडी : ओसरगाव येथे महामार्गालगतजळालेल्या स्थितीत आढळलेला ‘तो’ मृतदेह सावंतवाडी तालुक्यातील किनळे येथील अंगणवाडीसेविका सुचिता सोपटे हिचाच असून तिची हत्या करण्यात आल्याचे आता निष्पन्न झाले आहे. या प्रकरणातील संशयित आरोपीला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने आंबोली बेळगाव मार्गावरून गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास ताब्यात घेण्यात आले असून. तो वेंगुर्ले तालुक्यातील असल्याचे पुढे आले आहे. कर्ज बाजरी असल्यानेच त्याने या महिलेचा गोड बोलून काटा काढला असून पहिल्यांदा गाडीतील टॉमीने डोक्यावर घाव घालून मारले आणि तिला ओसरगाव येथे पेट्रोल ओतून जाळण्यात आल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. महामार्गावरील ओसरगाव येथे 25 फेब्रुवारीला मध्यरात्री सव्वाबारा वाजता एका महिलेचा जळत असलेला मृतदेह स्थानिकांना दिसून आला होता. मृतदेहाचा गुडघ्यापासूनचा एक पाय आणि एका हाताचा पंजा शिल्लक राहिला होता. ही बेपत्ता महिला कोण याचाच शोध पोलिस घेत असतनाच सावंतवाडी तालुक्यातील किनळे येथील अंगणवाडी सेविका सुचिता सोपटे ही बेपत्ता असल्याचे पुढे आले होते. पोलिसांकडून त्या दृष्टीने तपास सुरु केला आणि एक एक गुता हा सुटत गेला.

ही महिला 23 फेब्रुवारीपासून घरातून कोल्हापूर येथे डॉक्टर कडे जाते म्हणून निघून गेली होती. त्यानंतर तिचा मोबाईल लागत नव्हता घरातील दागिने ही घेऊन गेली होती. त्यामुळे घरच्यांनी पोलिसात बेपत्ताची तक्रार दिली होती. पोलिसांनी बेपत्ता तक्रारी वरुन महिलेचे शेवटचे लोकेशन कुठे दिसते तसेच महिला कुठून कुठे गेली याचाच तपास सुरु केल्यानंतर ओसरगाव येथील घटनेतील महिला ही किनळे येथील असल्याचे पुढे आले महिलेची मुलगी मुंबई वरून गुरुवारी कणकवली येथे दाखल झाली. तिने ही दागिन्या वरून आईचाच मृतदेह असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर पोलिसांनी यातील संशयित आरोपीवर लक्ष केंद्रित केले तेव्हा वेंगुर्ले येथील एका व्यक्तीचा या महिलेशी सतत संर्पक दिसून येत होता. त्यावरुन पोलिसांनी गुरुवारी रात्रीच या संशयित आरोपीला बेळगावच्या दिशेने जात असतनाच ताब्यात घेतले त्याने आपल्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे.

error: Content is protected !!