कुडाळ : प्रभाग क्रमांक २६३ पिंगुळी विभागामध्ये घरोघरी प्रचाराला सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यामध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह दिसून आला. आमदार वैभव नाईक यांचा प्रचार करत असताना प्रत्येक मतदारांना मार्गदर्शन करून घरोघरी शिवसेना युवासेना कार्यकर्ते पदाधिकारी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. यामध्ये मतदारांचा प्रचंड प्रतिसाद दिसून आला. यावेळी युवासेना तालुका सचिव केतन शिरोडकर,अनिकेत आदुर्लेकर, बाबल गावडे, दीपक गावडे, रामदास करंगुटकर, राजन पुरलकर, अजय बांदेकर, संजय वाळके. तसेच शिवसेना युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.