कोकणची दक्षिण काशी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे महाशिवरात्री निमित्त माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून श्री देव कुणकेश्वराचे पूजन करून दर्शन घेतले. यावेळी कुणकेश्वर देवस्थान कमिटीच्या वतीने वैभव नाईक यांचा शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ व मंदिराची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, युवासेना मालवण तालुका समन्वयक मंदार ओरसकर, सिद्धेश मांजरेकर, करण खडपे, अक्षय भोसले यांसह कुणकेश्वर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.