शिडवणे येथे जयंती कार्यक्रम उत्साहात संपन्न
शिडवणे : संत शिरोमणी गुरू रविदास महाराज हे तेराव्या शतकातील समाजवादी व विज्ञानवादी दृष्टिकोन बाळगणारे महान संत होते.संत रविदास यांचे मौलिक विचार आपण सर्वांनी तळागाळात नेऊन पोहोचवूया असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे यांनी शिडवणे येथे आयोजित संत रविदास जयंती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केले.
शिडवणे पाटणकरवाडी ता.कणकवली येथे आयोजित संत रविदास महाराज यांचा जयंती कार्यक्रम कासार्डे विभाग अध्यक्ष महेंद्र देवरुखकर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर,उन्नती मंडळाचे जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे, कणकवली तालुकाध्यक्ष महानंद चव्हाण,सरपंच श्री.शेट्ये,माजी गटविकास अधिकारी विजय चव्हाण,जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण,जिल्हा युवक अध्यक्ष प्रकाश वाघेरकर,युवा संकल्पचे अध्यक्ष आनंद जाधव,कणकवली कार्याध्यक्ष महेंद्र चव्हाण,सत्यविजय जाधव,विजय जाधव,प्रसाद पाताडे,प्रभाकर जाधव,संतोष जाधव,देवेंद्र देवरुखकर,श्री.पाटणकर,बुवा करंजेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कु.अभिषेक देवरुखकर याने संत रविदास यांच्याबद्दल भाषण सादर केले.तसेच सचिन हुंदळेकर,सरपंच शेट्ये,आनंद जाधव,महेंद्र चव्हाण,महानंद चव्हाण,विजय चव्हाण आदींनी आपले विचार केले.सर्वच वक्त्यांनी कासार्डे प्रभागाचे सातत्यपूर्ण कार्यक्रम घेण्यासाठी कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभाग सचिव संतोष जाधव यांनी,सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन देवेंद्र देवरुखकर यांनी केले.













