शिवसाम्राज्य प्रतिष्ठान फोंडाघाट आयोजित फोंडाघाट येथे शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे .

फोंडाघाट मध्ये होणाऱ्या उत्सवादरम्यान पालकमंत्री नितेश राणे यांचा होणार प्रतिष्ठान च्या वतीने नागरी सत्कार

फोंडाघाट / वार्ताहर

शिवसाम्राज्य प्रतिष्ठान फोंडाघाट यांच्या वतीने फोंडाघाट मध्ये सलग ८ व्या वर्षी शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे, शिवसाम्राज्य प्रतिष्ठान यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी शिवजयंती उत्सव फोंडाघाट एसटी स्टँड या ठिकाणी विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. यावेळी प्रथमच फोंडाघाट येथे आगमन होणाऱ्या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेशजी राणे यांचा यावेळी सन्मान होणार आहे.

सकाळी ८.०० वाजता रामगड येथून शिवज्योत फोंडाघाट येथे आणणे. त्यानंतर मूर्ती प्रतिष्ठापना व पूजन प्रमुख पाहुण्यांचे स्वागत सत्कार तीर्थप्रसाद संध्याकाळी सात वाजता सांस्कृतिक कार्यक्रम रात्री आठ वाजता ओमकार कला मंच सावंतवाडी निर्मित कलाविष्कार नृत्य, नाट्य, हास्य व विनोदांचा सदाबहार कार्यक्रम होणार आहे. यामध्ये खास आकर्षण गणेश जन्म देखावा, छत्रपती शिवाजी महाराज स्टॅच्यु, सोबत ज्योतिबा, सप्तशृंगी दर्शन व स्पेशल परफॉर्मन्स कांतारा अश्या सदाबहार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.


शिव साम्राज्य प्रतिष्ठान फोंडाघाट सलग आठव्या वर्षी ही शिवजयंती साजरी करत आहे. तरी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान शिवसाम्राज्य प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!