मुंबई: एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या पीएफच्या रकमेत घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. तीन हजारांहून जास्त एसटी कर्मचाऱयांच्या पगारातून कापलेली 1200 कोटी रुपयांची रक्कम पीएफ ट्रस्टमध्ये भरलेली नाही.ट्रस्टकडे गुंतवणुकीव्यतिरिक्त काहीच रक्कम शिल्लक नसल्याने राज्यातील तीन हजारांहून अधिक कर्मचाऱयांना ऑक्टोबरपासून पीएफची ऍडव्हान्स रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे कर्मचारी विवंचनेत सापडले आहेत. एसटी कर्मचाऱयांच्या पीएफ रकमेच्या घोळासह इतर प्रश्न आणि प्रलंबित मागण्यांकडे एसटी महामंडळाचे नवीन अध्यक्ष संजय सेठी यांचे महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने लक्ष वेधले आहे. एसटी महामंडळाने कर्मचाऱयांच्या पगारातून कापलेले 1200 कोटी रुपये पीएफ ट्रस्टमध्ये भरलेले नसल्यामुळे ट्रस्टकडे गुंतवणुकीव्यतिरिक्त काहीच रक्कम शिल्लक नाही. आधीच कमी पगार, त्यात पीएफची ऍडव्हान्स रक्कम मिळत नसल्याने कुटुंबीयांचे आजारपण, मुलामुलींची लग्ने, शैक्षणिक खर्च याचा आर्थिक भार पेलणे कठीण जात आहे.

एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या पीएफ रकमेत घोटाळा
1
/
105
आ. दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद #deepakkesarkar #sawantwadi
असलदे गावातील रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; असलदे ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन #kudal
8 August 2026
गोट्या सावंत यांचे नाव ऐकूनच समोरचा अधिकारी १०० वेळा विचार करतो - बाळू देसाई
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात श्री. मुंढे यांनी मांडले आपले विचार
आपल्या सगळ्यांची भक्कम साथ मिळाल्यामुळे मी या पदापर्यंत पोहोचलो - भरत चव्हाण
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात संदेश सावंत यांचे रोखठोक भाषण
येत्या वर्षभरात संघटनेचा मोठा विस्तार होईल - निलेश तेंडुलकर
केक एन बेक कॅफे - आता नव्या आणि प्रशस्त जागेत #kudal #sindhudurg
कुडाळ तालुक्यातील हा hidden धबधबा पहिला आहे का ? #sindhudurg
भारुड महोत्सव 2026" चे नांदगाव तिठा येथे भव्य आयोजन - प्रकाश पारकर #kankavli
1
/
105

Subscribe










