कणकवली : लग्नाचे अमिष दाखवून कणकवली शहरातील एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी सौरव बाबुराव बर्डे (वय ३१, रा.शिवाजीनगर कणकवली) याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला आज कणकवली पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता त्याला 15 फेब्रुवारी पर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. त्या पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार संशयी आरोपीने वर्षभर बलात्कार केला. तशी फिर्याद त्या महिलेने आज कणकवली पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर संशयित तरूणाला कणकवली पोलिसांनी तातडीने घरी जाऊन ताब्यात घेतले. याप्रकरणी तपासी अधिकारी यांनी संशयीताचा रिमांड मागताना अनेक मुद्द्यांचा समावेश केला असून या मुद्द्यांचा विचार करता संशयीताला एवढ्यात जामीन मिळण्याची ही शक्यता धूसर आहे. सौरव बर्डे याची वर्षभरापूर्वी त्या महिलेशी मैत्री झाली. या मैत्रीचा फायदा घेऊन तसेच लग्न करण्याचे आमिष दाखवून सौरव याने कणकवली शहरातील एका फ्लॅटवर तसेच आशिये रोड येथील एका फ्लॅटवर नेऊन शारीरिक संबंध ठेवले. तसेच अनेकवेळा मुडेडोंगरी येथेही नेऊन बलात्कार केला. असे त्या महिलेने फिर्यादीत नमूद केले आहे. या महिलेच्या तक्रारीनुसार काल सोमवारी सकाळी सौरव बर्डे याला कणकवली शहरातील शिवाजी नगर येथील घरातून पोलिसांनी अटक केली. अधिक तपास पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंडे करत आहेत.

बलात्कार प्रकरणी संशयित आरोपी सौरव बर्डे याला पाच दिवसांची पोलीस कोठडी
1
/
97
जे नियम हिंदूंना लागतात ते नियम इतर धर्मांना पण लागले पाहिजेत... | Nitesh Rane #niteshrane
अणुऊर्जा प्रकल्पावर सुशांत नाईक यांचा राणेंना टोला - Sushant Naik #kankavli
आपल्या मर्जीशियावाय कोणालाही तिथे फिरकू देऊ नका #niteshrane #devgad #sindhudurg
पर्यावरणाला हानी पोहोचणारा कोणताही प्रकल्प कोकणात येऊ देणार नाही... #niteshrane
मी माझ्या देवगडवर कोणालाही वाकड्या नजरेने बघू देणार नाही - नितेश राणे #niteshrane
मुळात या प्रकल्पाबाबत आम्हाला कोणालाही माहिती - nitesh Rane #niteshrane
पालकमंत्री नितेश राणे यांची पत्रकार परिषद - Nitesh Rane #niteshrane #devgad
राणेंची हुकुमशाही आम्ही सिंधुदुर्गात चालू देणार नाही - परशुराम उपरकर
शिक्षक भरतीत स्थानिक डी.एड. उमेदवारांना प्राधान्य द्या: प्रमोद जठार #pramodjathar #sindhudurg
सिंधुदुर्गात २८ जूनपासून पल्स पोलिओ मोहीम #sindhudurg #polio
सिंधुदुर्गात विनाशकारी प्रकल्प होऊ देणार नाही - परशुराम उपरकर #sindhudurg
ओसरगावचे माजी उपसरपंच प्रदीप तळेकर यांचा ठाकरे सेनेत प्रवेश! #kankavli #osargaon
1
/
97

Subscribe










