सकाळी उबाठा गटात प्रवेश करणारे पोखरण-कुसबे ग्रामस्थ माघारी.

बुद्धविहारासाठी निधी देतो म्हणून सांगत वैभव नाईक यांनी प्रवेश घेतल्याचा आरोप.

वैभव नाईक आमिष दाखवुन प्रवेश घेत असल्याचे उघड.

कुडाळ : आज सकाळी पोखरण-कुसबे येथील नागरिकांनी उबाठा गटात प्रवेश केल्याची माहिती वैभव नाईक यांनी आपल्या फेसबुक पेज वरून प्रसिद्ध केली होती ज्यात कुसबे येथील महेंद्र जाधव, अजय जाधव, अस्मिता जाधव, अश्विनी जाधव, आकाश जाधव, द्रौपदी जाधव, विलास जाधव, विनिता कदम, आनंद जाधव आदी भाजप कार्यकर्त्यांनी प्रवेश केला असा उल्लेख वैभव नाईक यांनी केला होता.

आज महायुतीचे उमेदवार निलेश राणे हे पोखरण दौऱ्यावर असताना उबाठा गटात प्रवेश केलेल्या या सर्वांनी निलेश राणे यांची भेट घेऊन आपली वैभव नाईक यांनी फसवणूक केली असल्याचे सांगितले. यावेळी आपण कणकवली येथे गेलो असता तुमच्या गावातील बुद्धविहारासाठी पैसे देतो असे सांगून आमचा प्रवेश दाखवला अस सांगत त्यांनी भाजपा प्रवेशाची इच्छा व्यक्त केली त्या नंतर आज सकाळी उबाठा गटात प्रवेश केलेल्या सर्वांनी पुन्हा भाजपा पक्षात प्रवेश केला असून या प्रवेशामुळे वैभव नाईक हे कश्या पध्द्तीने पक्षप्रवेश घेत आहेत हे जगजाहीर झालं आहे.

यावेळी ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, महिला तालुकाध्यक्ष सुप्रियाताई वालावलकर, देवेंद्र सामंत, ओरोस मंडल अनुसूचित जाती जमाती मोर्चा मंडल अध्यक्ष विनोद कदम, सचिन सावंत, प्रशांत तावडे, संदीप बागवे, रुपेश सावंत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *