सिंधुदुर्ग : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून ( उबाठा) प्रचार वक्त्यांच्या नियुक्त्या जाहीर झाल्या असून शिवसेनेच्या (उबाठा) सावंतवाडी, कुडाळ, कणकवली विधानसभा प्रचार वक्तेपदी स्वप्नील धुरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्वप्नील धुरी हे उबाठा शिवसेनेचा तरुण चेहेरा असून गेली अनेक वर्षे ते शिवसेनेसोबत काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी युवासेना सरचिटणीस पदाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडली आहे. त्यांच्यातील हेच नेतृत्व गुण ओळखून वरिष्ठांनी त्यांची प्रचार वक्तेपदी नियुक्ती केली आहे.