सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हयातील “ज्येष्ठ नागरिक मेळाव्याचे” कुडाळ येथे आयोजन

कुडाळ : मा. मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य यांच्या १०० दिवसांच्या ७ कलमी कृती आराखडयास अनुसरुन, सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाचे वतीने दि. ०८ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता ते दुपारी ०१.०० वाजताचे मुदतीत श्री. वासुदेवानंद सरस्वती सभागृह, आर.एस. एन. हॉटेलच्या पाठिमागे, उद्यमनगर, कुडाळ येथे “सिंधुदुर्ग जिल्हयातील ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा” हा नाविण्यपूर्ण उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त असून त्यांचे नातेवाईक नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेर आहेत. काही ज्येष्ठ नागरिक हे एकटेच राहत आहेत. त्यांना त्यांच्या अडचणींच्या वेळी त्वरीत पोलीसांची मदत व्हावी, तक्रारीचे योग्य प्रकारे निरसण व्हावे, कायदेविषयक तरतुदी, शासनाच्या विविध योजना, सायबर क्राईम व अन्य प्रकारे आर्थिक फसवणूक, आरोग्य विषयक अडचणी इत्यादीमध्ये सविस्तर मार्गदर्शन होऊन त्यांची सुरक्षितता अबाधित राहून आयुष्य निर्भयपणे सुखकर व्हावे आणि पोलीस आणि प्रशासनाशी थेट सुसंवाद व्हावा याकरीता “सिंधुदुर्ग पोलीस ज्येष्ठ नागरिक हेल्पलाईनचे उद्घाटन” होणार आहे.

सदर कार्यक्रमाचे उद्घाटन मा. नाम. श्री. नितेश राणे, मंत्री, मत्स्य व्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य तथा, पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्हा यांचे अध्यक्षतेखाली होणार असून मा. नाम. श्री. नारायण राणे, खासदार, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ, मा. श्री. निरंजन डावखरे, विधान परिषद सदस्य, मा. श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे, विधान परिषद सदस्य, मा. श्री. दिपक केसरकर, आमदार, सावंतवाडी विधानसभा, मा. श्री. निलेश राणे, आमदार, कुडाळ विधानसभा, मा. श्री. संजय दराडे, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र, मा. श्री. अनिल पाटील, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग, मा. श्री. मकरंद देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग याचे प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

सदर उपक्रमामध्ये पोलीस दलासोबत जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, शासकीय वैदयकिय महाविद्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, ग्रामीण आरोग्य यंत्रणा, सामाजिक न्याय विभाग, राज्य परिवहन विभाग, कृषी विभाग, महिला व बाल विकास विभाग, असे प्रशासकीय विभाग तसेच विविध ज्येष्ठ
नागरिक सेवा संघ व संघटना सहभागी, विविध स्वयंसेवी, महिला बचत गट आणि सामाजिक संस्था सहभागी होणार आहेत.

सदर उपक्रमामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या वैदयकिय तपासणीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे कायदेविषयक, आर्थिक गुंतवणूकीबाबत, विविध शासकीय योजना, सुरक्षितताविषयक माहिती देण्यात येणार आहे. महत्वाच्या अडचणींचा उहापोह करुन तात्काळ सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यांनी केलेल्या महत्वपूर्ण कार्याबद्दल यथोचित सत्कार करण्यात येणार आहे.

सदर उपक्रमास सिंधुदुर्ग जिल्हयातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाचे वतीने करण्यात येत आहे

error: Content is protected !!