तृतीयपंथीयांनाही मिळालं सौभाग्याचं वाण

बुलढाण्यात तृतीपंथीसोबत हळदीकुंकू;समाजापुढे नवा पायंडा

बुलढाणा: आपल्या संस्कृतीतील एक अमूल्य असा ठेवा म्हणजेच सौभाग्याचं वान देणारा मकरसंक्रांतीचा सण आपल्या संस्कृतीमध्ये मकरसंक्रांत व हळदीकुंकू सण हा सुवासिनींचा सण म्हणून ओळखला जातो. मात्र, जानेफळ (तालुका मेहकर) येथील समाजसेविका अ‍ॅडव्होकेट माधुरी देवानंद पवार यांनी यंदा तृतीयपंथीयांनासुद्धा सहभागी करून घेत त्यांना हळदीकुंकूचा सन्मान देत वेगळा पायंडा पाडला आहे. स्वराज्य जननी राजमाता जिजाऊचे माहेर असलेल्या जिल्ह्यातील हा अभिनव सोहळा आज सर्वत्र चर्चा आणि कौतुकाचा विषय ठरला.तृतीयपंथीय माता-भगिनींचा साडीचोळी देऊन अगदी त्यांच्या केसात गजरा माळून, त्यांना तिळगुळ भरवत हळदीकुंकू व वाण दिले. समाजामध्ये किमान महिलांसाठी काही चौकटी, मर्यादा आखून दिलेल्या आहेत. मात्र या विशिष्ट चौकट मोडण्यासाठी सप्तश्रृंगी महिला अर्बन पतसंस्थेच्या अध्यक्षा माधुरी देवानंद पवार यांनी पुढाकार घेतला.

error: Content is protected !!