गोळवणमधील एका ग्रामपंचायत सदस्याच्या मदतीनेच गेट चोरीला गेल्याचा ग्रामस्थांचा आरोप
मालवण : तालुक्यातील गोळवण ग्रामपंचायतीचा मजबूत व मोठा लोखंडी गेट अनेक वर्षांपासून सुस्थितीत होता. अचानक तो लोखंडी मजबूत गेट गायब झाल्याची घटना गेल्या महिन्यांपूर्वी घडली असून यामुळे गोळवण ग्रामस्थ प्रचंड आक्रमक झाले आहेत. गेल्या काही वर्षांपासून वापराविना असलेल्या या लोखंडी गेटकडे रस्त्यावरून जाणार्या व येणार्या स्थानिक लोकांचे लक्ष असे.काही महिन्यांपूर्वी हा लोखंडी गेट नटबोल्ट कापून चोरीला गेल्याचे स्थानिक ग्रामस्थांच्या लक्षात येताच गोळवण ग्रामस्थांनी हा विषय रविवारी डिकवल येथील ग्रामसभेत लावून धरत गोळवण मधील एका ग्रामपंचायत सदस्याच्या मदतीनेच हा लोखंडी गेट चोरीला गेल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी प्रचंड संताप व्यक्त केला तसेच लवकरच त्या ग्रामपंचायत सदस्याचे नाव जाहीर करणार असल्याची माहिती गोळवण ग्रामस्थांनी दिली आहे. लोखंडी गेट चोरी प्रकरणी गोळवण ग्रामपंचायत सभा प्रचंड गाजली आहे. हा सर्व प्रकार ग्रामपंचायत उघड्या डोळ्यांनी पाहूनसुद्धा मूग गिळून बसली आहे यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.













