कुडाळ : रविवार दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त शासन निर्णय व प्रशासकीय आदेश यांची पायमल्ली करून मनमानी व बेजबाबदार कारभार हाकणाऱ्या ग्रामपंचायत व्यवस्थापन व प्रशासन यांच्या मुजोर कार्यपद्धती विरोधात डिगस ग्रामस्थांकडून लाक्षणिक उपोषण छेडण्यात आले.
अशा विविध प्रश्नांसाठी डिगस ग्रामस्थांकडून आज प्रजासत्ताक दिनानिमित्त लाक्षणिक उपोषण छेडण्यात आले. यावेळी शेखर गोसावी, प्रवीण पवार, अरुण सावंत, विलास राणे, बाबू नाथ गोसावी, कांता पवार, राजन पवार, अनंत राणे, पांडू मेस्त्री, लिंगाजी परब, धोंडी सुर्वे, पांडू गोसावी, अभिनंदन पवार, अनिल कसबले, राजन डिगसकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.