माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांचा आरोप
बांदा : निगुडे पाटीलवाडी येथे ग्रामीण पाणी पुरवठा नळ योजनेची लोकांना जर असं पिण्याचे पाणी प्यावं लागत असेल तर ती दुर्दैवी गोष्ट आहे. या वाडीसाठी पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र टाकी आहे. परंतु ही टाकी साफ करत नसल्यामुळे किंवा त्याच्यामध्ये टीसीएल पावडर टाकत नसल्यामुळे आज या पाण्याची अवस्था देखण्याजोगी आहे. सरपंच श्री. लक्ष्मण निगुडकर यांना वारंवार सांगितलं गेलं ग्रामसभेमध्ये ही पिण्याच्या पाण्याच्या टाकी मध्ये टीसीएल पावडर किमान तीन महिन्यांनी तरी एकदा टाकून त्या टाक्या साफ करा. परंतु या ठिकाणी जाणून बुजून लोकांना असं पिण्याचे पाणी जर अस प्यायला लागते. आणि त्याच्यामुळे आजार उद्भवतात. या टाकीमध्ये गाळ साचून असलेली ही परिस्थिती निगुडे ग्रामपंचायत ज्या पद्धतीने मनमानी कारभार या ठिकाणी सरपंच, उपसरपंच करत आहेत यांना जर प्रशासनामधलं कळत नसेल सांगितलेलं ग्रामसभेमध्ये सांगून निर्णय जर घेता येत नसतील तर त्यांनी या खुर्चीवर बसून लोकांना त्रास देण्यापेक्षा घरी बसावं. निगुडे ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे विद्युत बिल ग्रामपंचायती निगुडे १,५०,००० थकबाकी आहे. तशी नोटीसही महावितरण ने ग्रामपंचायत प्रशासनाला काढलेली आहे. त्यामुळे या अनागोंदी कारभाराला जनता कंटाळली असून जर लोक नळ योजनेचे बिल भरत असतील. आणि आपल्याला त्या ठिकाणी ग्रामपंचायत प्रशासनाला वसुली करायला जर जमत नसेल तर ही दुर्दैवी बाब आहे. उद्या जर कनेक्शन पाणीपुरवठ्याचा रद्द केलं तर आम्ही रस्त्यावर उतरणार हे ग्रामपंचायतीने लक्षात घ्यावं असा इशारा आहे. त्यांनी आपल्या प्रसिद्धी माध्यमातून निगुडे माजी उपसरपंच श्री गुरुदास गवंडे यांनी दिला आहे .



Subscribe







