हरकुळ बुद्रुक शेखवाडीतील उबाठा मुस्लिम महिला कार्यकर्त्यांचा भाजपा मध्ये प्रवेश
आ.नितेश राणे यांच्या कार्याने प्रभावित
कणकवली प्रतिनिधी: कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक शेखवाडी येथील उबाठा गटाच्या मुस्लिम कार्यकर्त्या आसमा पटेल, नसरीन इमरान शेख, रसाई उमर शेख, अबिदा नासिर पटेल, रशिदा बशीर पटेल, शांताबाई दशरथ पवार, सायली धुतरे, शबाना पठाण यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश केला. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून कोणते विकास कामे होत नसल्याने आमदार नितेश राणे यांच्या कार्य कर्तुत्वावर प्रभावित होऊन भाजपमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले.
आ.नितेश राणेंकडून गावात विकास कामे
यावेळी आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून हरकुळ गावामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली. गावचा विकास आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून होऊ शकतो असा विश्वास त्यांना असल्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन हा प्रवेश केला असे प्रवेश करत्या महिला प्रतिनिधींनी सांगितले.
यावेळी आमदार नितेश राणे, यांच्या सोबत गोट्या सावंत, इम्रान शेख, राजू पेडणेकर, बुलंद पटेल, जाहीर खान आदि भाजप उपस्थित होते..













