तब्बल सत्तावीस वर्षानंतर डीएडच्या माजी विद्यार्थ्यांचा भरला स्नेह मेळावा

प्र.मुख्याध्यापिका सौ.अनुजा सावंत यांचा ही केला सन्मान

सिंधुदुर्ग : कै. बी.बी. सावंत अध्यापक विद्यालय डिगस ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग च्या सन १९९५ – ९७ या वर्षातील डीएड विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याने नवसरणी केंद्र सावंतवाडी येथे जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी महाराष्ट्रातून नंदुरबार, मुंबई, रायगड, नांदेड, सातारा, पुणे, कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माजी विद्यार्थी हजर होते, प्रथम राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली प्रार्थना व उपस्थिती घेण्यात आली मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले दिगंबर तळणकर व अर्चना तळणकर यांनी आलेल्या सर्व मित्रांचे औक्षण करून सर्व मित्रांना भेटवस्तू व गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.
या कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आपापली मनोगत व्यक्त केली. मनोरंजक खेळ व प्रश्नमंजुषा घेण्यात आली.


तब्बल सत्तावीस वर्षानंतर जुन्या मित्र-मैत्रिणींची भेट झाल्याने सगळ्यांचा चेहरा आनंदाने फुलला होता शेवटी सध्या कोण कुठे राहतो काय करतो कोणत्या पदावर काम करतो या सर्व चर्चा गप्पांमध्ये रंगल्या स्नेहभोजन देण्यात आले शेवटी हा एक अविस्मरणीय क्षण ठरला, स्नेहमेळाव्याचे प्रतीक म्हणून वृक्षारोपण करण्यात आले, जिल्ह्यातील तळवडे नं.९ वेंगुर्ला, आवळेगाव ,वेताळ बांबर्डे, डिगस या शाळांना शैक्षणिक भेटी दिल्या. कॉलेजचे प्राचार्य सुनील खोत यांना सन्मानपत्र देण्यात आले, वेंगुर्ला तालुका गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी प्राध्यापक राजेंद्र घाडीगावकर गंगाराम सडवेलकर डिगस हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.अनुजा सावंत यांचा ही सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सुमन परब यांनी केले तर आभार संजय घाडीगावकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गृप एडमिन संजय नागरे दत्तात्रय धायगुडे हनुमंत नाईक अरविंद झेंडे यांनी प्रयत्न केले.

error: Content is protected !!