आ.निलेश राणे यांची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मागणी
कुडाळ आगारासाठी किमान २५ तर मालवण आगरासाठी किमान १८ गाड्यांची मागणी
कुडाळ: कुडाळ मालवण आगारात एकंदरीत बस ची स्थिती पाहता अनेक बस ह्या तांत्रिक दृष्ट्या सक्षम नसून कित्तेक वेळा बस मधे तांत्रिक बिघाड झाल्यामुळे बस स्थानकातून उशिरा सुटतात तर काही वेळा मधेच बंद पडतात.त्यामुळे प्रवाशांचे आणि तसेच बस चालक आणि वाहक यांनी देखील त्रास सहन करावा लागतो.मात्र आता यावर तोडगा निघाला असून लवकरच कुडाळ मालवण बस आगारात नवीन ४३ बस देण्याची मागणी आ.निलेश राणे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी दिले आहे.
काय आहे निवेदन?
पत्रात म्हटले आहे की, माझ्या मतदार संघातील राज्य परिवहन महामंडळाच्या कुडाळ व मालवण आगारातील अनेक बस नादुरुस्त असून यामुळे ग्रामीण भागातील अनेक फेऱ्या रद्द करायची वेळ आली आहे. यामुळे शाळकरी मुले व नोकरीनिमित्त प्रवास करणारे नागरीक, महिला. वृद्ध यांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे. तरी सदरील प्रश्नांचा गांभीर्यपूर्वक विचार करत माझ्या मतदार संघातील कुडाळ आगारासाठी किमान २५ तर मालवण आगरासाठी किमान १८ अश्या एकूण ४३ नविन एसटी बस उपलब्ध करून देऊन सहकार्य करावे. अशी मागणी आमदार निलेश राणे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे.



Subscribe








