कोकणच्या लाल मातीशी नाळ जोडलेले थोर समाजसेवक श्री. वैभव जाधव साहेब आणि दिवा भूषण पुरस्कार प्राप्त सन्माननीय श्री. स्वप्नील मेस्त्री बुवा यांच्या प्रेरणेतून आणि कोकण आधार प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा सन्माननीय श्री. उमेश पाटील साहेब यांच्या सहकार्याने दिवा नगरीत सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. वैभव जाधव साहेब यांचे उत्तम नियोजन,प्रचंड मेहनत आणि आई ग्रुपच्या ऐक्याचा सामाजिकतेचा प्रचंड असा महामेरू यामुळे कोकण आधार प्रतिष्ठानचा दिनदर्शिका सोहळा जल्लोषात संपन्न झाला. पुष्पहारातला दोरा जसा महत्वाचा असतो तसे नेतृत्व खूप महत्त्वाचे असते वैभव जाधव साहेब म्हणजे ते जणू पुष्पहारातील दो-याप्रमाणे कार्यरत होते. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एक एक मावळा गोळा करत सामाजिक बांधिलकी जपत, कोकणच्या दिलदार, सहृदयी समाजसेवेचे व्रत घेवून कोकणच्या लाल मातीत अवतरलेली भजनगायन,वादन, नृत्य कलावंताना आपल्या कोकणवासीयांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सदैव प्रचंड तळमळ, आत्मियता, आपुलकी स्नेहभाव ठेवून माणसांना एकत्रित आणून वैभव जाधव साहेब आणि स्वप्नील मेस्त्री बुवा यांनी कार्यक्रम संपन्न केला. खरं तर वैभव जाधव साहेब यांना कधी पदाचा ध्यास नाही पण कोकणच्या सांस्कृतिक, सामाजिक ऐक्यासाठीचा सदैव ध्यास हाच श्वास बनला होता. त्यामुळे असे भव्य दिव्य कार्यक्रम संपन्न करणे शक्य होते.
कोकणच्या सामाजिक, सांस्कृतिक,ऐक्यासाठी उत्कर्षासाठी एकवटलेल्या दिवा शहरातील कोकणवासीयांनी कोकण आधार प्रतिष्ठान संस्था गतवर्षी सन २०२४ रोजी स्थापन केली होती. कोकण आधार प्रतिष्ठान आणि आई ग्रुप आयोजित नववर्षाच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा शनिवार दि.११ जानेवारी.२०२५ रोजी दिवा शहरातील एस. एम. विद्यामंदिर,दिवा येथे लोकप्रिय नवनिर्वाचित आमदार सन्माननीय श्री. राजेशजी मोरे साहेब,माजी महापौर श्री. रमाकांत मढवी साहेब, शैलेश पाटील साहेब, नगरसेवक दिपक जाधव,अमर पाटील, विभाग प्रमुख भालचंद्र भगत,उमेश भगत साहेब,समाज सेवक संजय भगत,प्रदीप मढवी साहेब यांच्या उपस्थितीत नववर्षाच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा जल्लोषात संपन्न झाला. माजी उपमहापौर सन्माननीय श्री. मढवी साहेब यांनी आपल्या मनोगतात कोकण आधार प्रतिष्ठान संस्थेला शुभेच्छा देताना सदैव सहकार्याचा जिव्हाळा व्यक्त केला. लोकप्रिय आमदार सन्माननीय श्री. राजेशजी मोरे साहेब यांनी आपल्या कोकणच्या कलासंस्कृती, सामाजिक बांधिलकी जपणा-या जिव्हाळ्याच्या माणसांचे आभार मानले. कोकण आधार प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा,थोर उद्योजक आणि दानशूर कर्णाचा अवतार म्हणून ओळखले जाणारे समाजसेवक सन्माननीय श्री.उमेश पाटील साहेब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मालवणी पद्धतीने खणखणीत गा-हाणारुपी प्रार्थनेने कार्यक्रमाचा आरंभ करण्यात आला. मान्यवरांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन झाले.कोकण आधार प्रतिष्ठान तर्फे कलागुणांना वाव देण्यासाठी दिवा नगरीत गुणवंत बालकलाकारांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. पखवाज वादक,गायक, हार्मोनियम वादक, नृत्य अशा विविध कलागुणांमध्ये प्राविण्य दाखविणा-या बालकलाकारांचा सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कोकण आधार प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी कला,क्रिडा, साहित्य,विज्ञान, सामाजिक बांधिलकी अशा सर्वच क्षेत्रात उन्नतीसाठी प्रगतीसाठी उत्कर्षासाठी कार्य करण्याची ध्येय धोरणे व्यक्त करण्यात आली. दरवर्षी आरोग्य शिबीर, नेत्र चिकित्सा शिबीर, दिव्यांग व्यक्तींसाठी अवयवदान, जुन्या वस्तू गोळाकरुन दिवा नगरीत ‘ माणुसकीची भींत’ उभी करण्याचे ध्येय धोरणे स्पष्ट करण्यात आले. दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने तिरंगी डबलबारीचे आयोजन करण्यात आले होते. तुफान गर्दीत कोकणची संस्कृती परंपरा रितीरिवाज जपणारी जंगी डबलबारीचा तिरंगी सामना संपन्न झाला. कोकणचे ख्यातनाम भजनीबुवा श्री.गुंडु सावंत, बुवा दिनेश वागदेकर आणि श्रीकांत शिरसाट बुवा यांनी तिरंगी डबलबारीत खळखळून मनोरंजन व संगीतमय भक्तीरसात अक्षरशः प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवले. अनेक मान्यवर भजनी बुवा, नामवंत दशावतारी कलावंत उपस्थित होते.

कोकण आधार प्रतिष्ठान आणि आई ग्रुप दिनदर्शिका प्रकाशन सोहळा जल्लोषात संपन्न.
1
/
98
कोकणातला पहिला पाऊस... आणि चढणीचे मासे
कणकवली नगरसेवक बाळू पारकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा! #kankavli #sindhudurg
मग मूठभर भगवाधार्यांसाठी पोलीस कशाला ? #niteshrane #kolhapur
छत्रपती शिवरायांचा मावळा असा छातीठोकपणे उभा राहतो #niteshrane #kolhapur
आम्ही सर्व धर्म समभाव आम्ही मानत नाही #niteshrane #kolhapur
या लोकांच्या अब्बाचा पाकिस्तान आहे का ? #niteshrane #kolhapur
जे नियम हिंदूंना लागतात ते नियम इतर धर्मांना पण लागले पाहिजेत... | Nitesh Rane #niteshrane
अणुऊर्जा प्रकल्पावर सुशांत नाईक यांचा राणेंना टोला - Sushant Naik #kankavli
आपल्या मर्जीशियावाय कोणालाही तिथे फिरकू देऊ नका #niteshrane #devgad #sindhudurg
पर्यावरणाला हानी पोहोचणारा कोणताही प्रकल्प कोकणात येऊ देणार नाही... #niteshrane
मी माझ्या देवगडवर कोणालाही वाकड्या नजरेने बघू देणार नाही - नितेश राणे #niteshrane
मुळात या प्रकल्पाबाबत आम्हाला कोणालाही माहिती - nitesh Rane #niteshrane
1
/
98

Subscribe










