निवडणुकीत आपला पराभव झाला असला तरी पराभवाला खचून न जाता पुन्हा एकदा नव्या उमेदीने सर्वांनी काम करूया. एकसंघ आणि एकजुटीने कार्यरत राहून शिवसेनेला बळकटी देऊया, एकदिवस आपल्या लढ्याला नक्कीच यश मिळेल असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कणकवली तालुका कार्यकारिणीची बैठक रविवारी मातोश्री हॉल येथे संपन्न झाली. या बैठकीला शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी माजी आमदार परशुराम उपरकर म्हणाले, शिवसेना पक्ष सर्वसामान्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणारा पक्ष आहे.मात्र जनतेने दिलेला कौल मान्य करून येणाऱ्या काळात जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवून सिंधुदुर्गात सक्षमपणे विरोधी पक्षाचे काम आपण करू असे सांगितले.
माजी आमदार वैभव नाईक म्हणाले, ज्या मतदारांनी आपल्यावर विश्वास दाखवला त्यासाठी आपल्याला लढावेच लागेल. प्रत्येकाला संधी मिळत असते भविष्यात शिवसेनेलाही संधी मिळेल त्यासाठी आपण काम करीत राहिले पाहिजे
कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत म्हणाले सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याचे काम यापुढेही आपण सुरु ठेवले पाहिजे. प्रत्येक शिवसैनिकाने जनतेच्या न्याय हक्कासाठी झगडले पाहिजे. त्यासाठी आम्ही सर्वजण आपल्या सोबत आहोत असा विश्वास दिला.
यावेळी महिला जिल्हाप्रमुख निलम पालव,उपजिल्हाप्रमुख बंडू ठाकूर,तालुकाप्रमुख कन्हैया पारकर,तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत,उपतालुका प्रमुख बाबू पेडणेकर,आबू पटेल, जयसिंग नाईक,महिला तालुका संघटक वैदेही गाडेकर,उपतालुका संघटक संजना कोलते,युवासेना तालुका प्रमुख उत्तम लोके, प्रतीक्षा साटम,अनुप वारंग,तात्या निकम,धनश्री मेस्त्री,राजू राठोड, सचिन सावंत,तेजस राणे, गुरुनाथ पेडणेकर, रुपेश आमडोस्कर, राजू रावराणे,विलास गुडेकर, धीरज मेस्त्री आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111


Subscribe










