मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एमएमआरडीए) आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. या बैठकीत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त यांनी प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांचा आढावा सादर केला. या कामांचा आढावा घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील निर्देश दिले.
✅ सर्व मेट्रो मार्गांच्या कामांचे पूर्ण होण्याचे वेळापत्रक नव्याने तयार करण्याचे तसेच या कामात कदापिही विलंब न करण्याचे तसेच किमान २३ किमी मेट्रो मार्गाचे उद्घाटन सुनिश्चित करण्यासाठी नियोजनबद्ध काम करण्याचे निर्देश
✅ कारशेडशिवाय मेट्रो सुरू करण्यासाठी तात्पुरत्या पर्यायी व्यवस्था करणे, भविष्यातील संभाव्य मेट्रो प्रकल्पांचा आढावा घेत त्यांच्या कारशेडसाठी जागा आरक्षित ठेवणे आणि वर्ष २०२५ अखेरपर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देश
✅ पुढील वर्षीपासून दरवर्षी किमान ५० किमी मेट्रो कार्यान्वित होतील असे नियोजन करण्याचे निर्देश
✅ इंदू मिल येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक डिसेंबर २०२५ अखेरीस पूर्ण करण्याचे निर्देश
✅ हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून या दोन्ही प्रकल्पांच्या (इंदू मिल) वार्षिक देखभालीसाठी आराखडा आताच तयार करण्याचे निर्देश
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, संबंधीत विभागांचे सचिव तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.