बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यासोबत आरोपी सुधीर सांगळे यालादेखील अटक करण्यात आली आहे. गेले २६ दिवस हे आरोपी फरार होते. पुणे येथून या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी ही कारवाई केली आहे. दरम्यान कृष्णा आंधळे हा आरोपी अद्याप फरार आहे.
