भारतीय जनता युवा मोर्चा पुरस्कृत व संदीप मेस्त्री मित्रमंडळ आयोजित कलमठ चषक

क्रेझी बॉईज डे – नाईट क्रिकेट स्पर्धा २०२५

कणकवली : भारतीय जनता युवा मोर्चा पुरस्कृत आणि संदीप मेस्त्री मित्र मंडळ आयोजित कलमठ प्रीमियर लीग या भव्य डे – नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक २२ ते २६ जानेवारी २०२५ या कालावधीत अशिये माळ, कलमठ येथे ही स्पर्धा होणार असून या स्पर्धेतील विजेत्या संघास ₹ १०००२५ /-आकर्षक चषक दिले जाणार आहे. उपविजेत्या संघास ₹ ५००२५ /- आकर्षक चषक तर दोन्ही उपविजेत्या संघाना प्रत्येकी ₹ ५०२५/- आकर्षक चषक दिले जाणार आहे. या स्पर्धेसाठी ₹ २००००/- फी असून स्पर्धेसाठी इच्छुक खेळाडूंनी दिनांक ७ जानेवारी २०२५ पर्यंत नावनोंदणी करावी असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

स्पर्धेचे नियम :

▪️ स्पर्धा १६ संघांमध्ये लीग पद्धतीने होईल.

▪️ स्पर्धा जिल्हा मर्यादित असून खेळाडू लिलाव पद्धतीने निवडण्यात येतील.

▪️ प्रत्येक संघामध्ये महाराष्ट्र व गोवा राज्यातील १ खेळाडू ICON म्हणून घेता येतील.

error: Content is protected !!