मंत्री नितेश राणे यांचे नवे वक्तव्य पुन्हा चर्चेत

केरळ म्हणजे मिनी पाकिस्तानच आहे म्हणूनच प्रियांका गांधी तिथून निवडून येतात. असे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी म्हटले आहे. तेथील सर्व अतिरेकी त्यांना मतदान करत असल्याचे वक्तव्य देखील त्यांनी केले आहे.

दरम्यान अफझल खान वधाचे पोस्टर कोणी लावू नका त्यामुळे भावना दुखावतील असे सांगण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. ज्या देशात ८५ % हिंदू राहतात, ज्या देशातील नसानसांत छत्रपती शिवराय वसतात, आमच्या प्रत्येक श्वासावर छत्रपती संभाजी महाराजांचा अधिकार आहे. मग त्या देशात अफझल खान वधाचे पोस्टर लावायचे नाहीत तर मग पाकिस्तानात लावायचे का ? असा सवाल देखील त्यांनी केला.

error: Content is protected !!