वाल्मीक कराड शरण येणार ?

बीड : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीने चारही बाजूंनी फास आवळला आहे. त्यानंतर आता आरोपी वाल्मिक कराड 24 तासात आत्मसमर्पण करण्याची शक्यता आहे. वाल्मिक कराड याची बँक खातीही गोठवण्यात आली आहेत. त्यामुळे वाल्मिक कराडच्या पुढे फक्त आत्मसमर्पणचा पर्याय शिल्लक आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये बीडमध्ये सीआयडीच्या जवळपास 9 टीम कार्यरत आहेत. या टीममध्ये सुमारे 150 हून अधिक सीआयडीचे अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्व टीमनी सुमारे 100 पेक्षा अधिक लोकांची या प्रकरणामध्ये आतापर्यंत चौकशी केली आहे.

error: Content is protected !!