नाताळनिमित्त जिव्हाळा आश्रम माड्याचीवाडी येथे करमणुकीचे कार्यक्रम संपन्न

कुडाळ : गुरुवार दिनांक 26/12/2024 रोजी जिव्हाळा आश्रम माडयाचीवाडी रायवाडी येथे जिव्हाळा सेवाश्रमच्या सभागृहात गीडियन्स इंटरनॅशनल मिनिस्ट्री सिंधुदुर्ग संस्थेमार्फत ब्रदर अंथोनी डिसोजा व त्यांच्या सहकार्याने नाताळ दिनाचे औचित्य साधून आश्रमातील लाभार्थ्यांची कर्मणूकीचे विविध प्रकारचे कार्यक्रम सादर करून त्यांच्यामध्ये उत्साह उमेद व जगण्याची इच्छा जागृत करून अतिशय नीटनेटका कार्यक्रम सादर केला.

सदर कार्यक्रमास जिव्हाळा सेवाश्रमाचे ट्रस्टी, सल्लागार, उपसमितीचे सदस्य तसेच श्री बाबीदास गावडे.श्री जयप्रकाश प्रभू. श्री संदीप बिर्जे श्री संजय बिर्जे.कुमारी गीतांजली बिर्जे आर्या बिर्जे.सौ शोभा बिर्जे सौ निर्मला हेंडोरकर.सौ.राणी तसेच गीडियन्स इंटरनॅशनल मिनिस्ट्री सिंधुदुर्ग संस्थेचे श्री.सुमित काणेकर श्री.सुधीर पावसकर श्री.मायकल फर्नांडिस श्रीम. फिलोमिना अंथोनी डिसोजा इत्यादी उपस्थित होते. सदर कार्यक्रमच अतिशय नीटनेटका व अत्यंत उत्कृष्टपणे सादर करून जिव्हाळा सेवाश्रमात आनंदाचे वातावरण निर्माण केले.


सन 2016 साली जिव्हाळा सेवाश्रमाची मुहूर्तमेढ रोवलेल्या आश्रमाची वाटचाल अतिशय बिकट परिस्थितीत होऊन सुद्धा आज अखेर म्हणजेच 9 वर्षांमध्ये आश्रमाने अतिशय नेत्र दीपक केलेली आहे.आश्रमात निराधार,अपंग, निराश्रीत लोकांची आश्रममध्ये सेवा केली जाते,परंतु आश्रमाला सुद्धा सेवाभावी संस्थांची व्यक्तींच्या सहकार्याची अपेक्षा आहे.

error: Content is protected !!