कुडाळ : कसाल येथील उद्योजकसंतोष कदम आणि डॉ. श्रेया कदम यांची कन्या तन्वी हिने चार्टर्ड अकाऊंटंट या परीक्षेत यश मिळविले. अतिशय कमी टक्केवारीत या परीक्षेचा निकाल लागतो. हा निकाल देशपातळीवर असतो. ती एकाच वेळी दोन ग्रुप घेवून या परीक्षेस बसली होती आणि पहिल्याच प्रयत्नात ती चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाली. ती डॉन बॉस्को हायस्कूल ओरोसची विद्यार्थिनी होती. दहावीच्या परीक्षेत तीने १००% गुण मिळविले होते. तसेच मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स या कॉलेजमध्ये बारावी परीक्षेत ति ९२% गुण मिळवून उत्तीर्ण झाली होती तसेच ती बी. कॉम. परीक्षेतही टॉपर होती.सातत्याने शैक्षणिक वाटचालीत तिने यापूर्वी खेळ, सांस्कृतिक विभाग आणि अभ्यास या क्षेत्रात यश मिळविले होते.