विधानसभा निवडणुकानंतर आता नगरपरिषद निवडणुकांच्या हालचालींना वेग

कुडाळ: विधानसभा निवडणुका झाल्यानंतर आता मंत्रीमंडळाचे वाटप देखील झाले आहे. त्यानंतर नगरपरिषद व नगरपंचायत तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या हालचालींना वेग आला आहे. वरिष्ठ पातळीवर याबाबत कामकाज सुरु झाल्याचे संकेत प्राप्त होत आहेत. याबाबत कोणतीही चर्चा किंवा तसे वृत्त प्रसिद्ध झाले नसले तरी पंचायत राज संस्थांच्या निवडणुकांना ब्रेक लावून तसेच बाजारसमित्यांच्या निवडणुका पुढे ढकलून प्रथम नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका घेण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. त्यादृष्टीने हालचाली सुरु झाल्याचे खात्रीशीर गोटातील वृत्त आहे.

error: Content is protected !!