सिंधुदुर्ग : तळगाव हितवर्धक संघ मुंबई संचालित श्री रामेश्वर माध्यमिक विद्यालय व श्री रामेश्वर प्राथमिक शिक्षण शाळा तळगाव येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलन शनिवार दिनांक २१ जानेवारी २०२४ रोजी संस्थेचे अध्यक्ष श्री. आनंद दळवी यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
वार्षिक पारितोषिक वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन डिगस विद्यालयचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री.दीपक आळवे सर तसेच सरंबळ विद्यालयचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री.विवेक बालम हे उपस्थित होते तर या कार्यक्रमासाठी तळगांव सरपंच कु.लता खोत, संस्थेचे खजिनदार श्री.प्रकाश चव्हाण,शालेय समिती अध्यक्ष श्री.उत्तम दळवी, संस्था संचालक श्री. सूर्यकांत दळवी, श्री.प्रभानंद दळवी, विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री.प्रदीप शिंदे सर ,संस्थेचे सदस्य श्री.बाळाजी दळवी ईत्यादी मान्यवर उपस्थित होते
वार्षिक पारितोषिक वितरण समारंभा मध्ये शैक्षणिक तसेच क्रीड़ा व कला स्पर्धामधील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे व उपस्थित पदाधिकारी यांच्या हस्ते पारितोषिक व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.
रात्रीच्या सत्रामध्ये स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम मोठ्या दिमाखात संपन्न झाला.या कार्यक्रमाला तळगाव- सुकळवाड गावातील ग्रामस्थ,माजी विद्यार्थी आणि पालक यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती दर्शविली.या कार्यक्रमात विद्यालयच्या माध्यमिक व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी नृत्य आणि पथनाट्य यांचे उत्कृष्ट आविष्कार सादर केले. विद्यार्थ्यानी सादर केलेल्या कलेला उपस्थितांनी रोख पारितोषिक आणि टाळ्यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.विद्यार्थ्यानी सादर केलेले बॉर्डर व पावनखिंड या दोन नाटकांना दशकांची विशेष पसंती लाभली.
हे दोन्ही कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका सौ.शिरोडकर मॅडम यांनी उच्च दर्जाचे नियोजन केले होते त्याला त्यांच्या सहकारी शिक्षक, कर्माचारि, स्थानिक स्वराज्य संस्थेतील विद्यार्थी प्रतिनिधी आणि पालकांनी योग्य असे सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेष्ठ सेवानिवृत शिक्षक श्री.पंडित माने यांनी केले.
जेष्ठ शिक्षक श्री.गुरुनाथ भटगावकर सर यांनी दोन्ही कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या प्रमुख पाहुणे, संस्था पदाधिकारी, शालेय समिती पदाधिकारी व सदस्य, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, पालक, माजी विद्यार्थी यांचे विद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त केले.