मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
ब्युरो न्यूज: किसान सन्मान योजना तसेच नमो शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना १२ हजार रुपये मिळत होते. लवकरच ते वाढवून १५ हजार करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले,छोट्या शेतकऱ्यांकरीता जी किसान सन्मान योजना सुरू केली आहे.सुरुवातीला यामधून शेतकऱ्यांना ६ हजार रुपये मिळत होते मागच्या काळात आपण त्यामधे ६ हजार रुपये अजून वाढ केली आहे.तशीच वाढ नमो शेतकरी सन्मान योजना आपण सुरू केली.यामधे आपण बारा हजार रुपये शेतकऱ्यांना देतो लवकरच बारा हजार नाही तर १५ हजार रुपये शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण घेणार आहोत.
https://x.com/BJP4Maharashtra/status/1871146266140574091?s=19